Advertisement

'अशा' पद्धतीनं मुंबई महानगरपालिका लावणार ४ लाख वृक्ष

२०२०-२१ च्या नागरी अर्थसंकल्पात बीएमसीनं ६५ कोटी रुपये इतकं बजेट ठेवलं आहे.

'अशा' पद्धतीनं मुंबई महानगरपालिका लावणार ४ लाख वृक्ष
SHARES

मुंबईत गेल्या काही महिन्यांत विकासाच्या नावाखाली अनेक भागात झाडे तोडण्यात आली आहेत. गेल्या पाच वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील २५ हजार झाडं तोडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, या झाडे तोडण्याची भरपाई म्हणून बीएमसी मियाकी तंत्रज्ञानाचा वापर करून ४ लाख झाडे लावणार आहे. यासाठी २०२०-२१ च्या नागरी अर्थसंकल्पात बीएमसीनं ६५ कोटी रुपये इतकं बजेट ठेवलं आहे.

झाडे तोडल्यामुळे मुंबईतल्या हवामानावर वाईट परिणाम होत आहे. त्यात दिवसेंदिवस काँक्रिटिकरण वाढत चालले आहे. वातावरणात संतुलन राखण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून आता पालिकेनं अधिकाधिक झाडं लावण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलं आहे की, सन २०२०-२१ आर्थिक वर्षात ६५ महानगरपालिका उद्यानं आणि भूखंडांमध्ये सुमारे चार लाख झाडे लावली जातील. मियावाकी तंत्राचा वापर झाडे वाढवण्यासाठी केला जाईल

मुंबईत वेगवेगळ्या भागात विकासकामांमुळे झाडे तोडली जात आहेत. आरे इथं सुरू असलेल्या मेट्रो कार्ड शेडसाठीही २ हजार ७०० झाडं तोडण्यात आली. नुकतीच महापालिकेनं वाशीच्या तिसऱ्या पुलाच्या बांधकामात अडथळा आणणारी १३७ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे. यापैकी २६ झाडं तोडली जातील आणि १०१ झाडं पुनर्निर्मिती केली जातील, असं महापालिकेचं म्हणणं आहे.हेही वाचा

मेट्रोच्या 'या' डेपोचं ९० टक्के काम पूर्ण

मिरा भाईंदर ते डोंबिवली दरम्यान करा पाण्यातून प्रवास


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा