Advertisement

मेट्रोच्या 'या' डेपोचं ९० टक्के काम पूर्ण

मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या मेट्रो मार्गिकेच्या डेपोसाठी गोरेगाव आणि दहिसर येथील जागा उपलब्ध नसल्यानं मेट्रो २ ए (दहिसर ते डी. एन. नगर) या मर्गिकेच्या डेपोचा वापर दोन्ही मार्गिकांना करावा लागणार आहे.

मेट्रोच्या 'या' डेपोचं ९० टक्के काम पूर्ण
SHARES

चारकोप (Charkop) येथील डेपोचे (Depot) ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. मेट्रो ७ (Metro-7) (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) या मेट्रो मार्गिकेच्या डेपोसाठी गोरेगाव (Goregaon) आणि दहिसर (Dahiser) येथील जागा उपलब्ध नसल्यानं मेट्रो २ ए (दहिसर ते डी. एन. नगर) या मर्गिकेच्या डेपोचा वापर दोन्ही मार्गिकांना करावा लागणार आहे. या दोन्ही मार्गिका वर्षअखेर कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट आहे. 

चारकोप येथील डेपोचं ९० टक्के काम पूर्ण झालं असून, डेपोअभावी मार्गिका कार्यान्वित होण्याचं रखडणार नसल्याचं प्रतिपादन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (Mumbai Metropolitan Region Development Authority) केलं आहे. वर्षअखेर सुरू होणाऱ्या मेट्रो ७ मार्गिकेच्या डेपोसाठी गोरेगाव आणि दहिसर येथील २ जागांचा पर्याय होता. दहिसर (Dahiser) येथील जागा भारतीय विमानतळ प्राधिकरणाची असून, गोरेगाव येथील जागेवर विधि विद्यापीठ प्रस्तावित असल्याचं समजतं.

या जागा उपलब्ध होण्यास विलंब लागत असल्यामुळं चारकोप (Charkop) येथील डेपोमध्येच मेट्रो ७ वरील मेट्रो गाड्यांना (Metro) सामावून घेण्यात येणार आहेत. त्यामुळं मेट्रो ७ मार्गिकेवरील दहिसर या अंतिम स्थानकापासून चारकोप डेपोपर्यंतचं ७ किमीचं अधिकचं अंतर मेट्रो (Metro) गाड्यांना रोज पार करावं लागणार आहे.

चारकोप येथील डेपो हा मुख्यत: मेट्रो २ ए (Metro-2A) मार्गिकेसाठी बांधण्यात येत आहे. चारकोप येथील डेपो बांधणीचा खर्च सुमारे ११० कोटी रुपये असून, सध्या ९० टक्के काम पूर्ण झालं आहे. तसंच, मेट्रोचा पहिली ट्रेन दाखल होण्यापूर्वी काम पूर्ण होईल असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त करण्यात आला. डेपोचं बांधकामाचं काम पूर्ण झालं असून, इतर यंत्रणांच्या कामासाठी संबंधित कंत्राटदारास डेपोचा ताबा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

चारकोप येथील डेपो हा १६.४ हेक्टरवर उभारण्यात येत असून, यामध्ये २५ मार्गिका आहेत. ८ डब्यांच्या २४ मेट्रो गाड्या यामध्ये सामावून घेता येणार आहेत. एमएमआरडीएनं मेट्रो ७, मेट्रो २ ए आणि मेट्रो २ बी या ३ मार्गिकांसाठी प्रत्येकी ६ डब्यांच्या ६३ मेट्रो गाड्यांच्या उत्पादनाचं कंत्राट दिलं आहे. मेट्रो डब्याच्या प्रारूपाचं उद्घाटन पंतप्रधानांनी सप्टेंबरमध्ये केलं होतं, तर ६ डब्यांची पहिली ट्रेन सप्टेंबर २०२० मध्ये दाखल होणार आहे.हेही वाचा -

आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे

कुख्यात गुंडाचे या राजकिय नेत्यांशी जवळचे संबध…पहा फोटो !संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा