Advertisement

आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे

शिवसेनेने कधीही झेंड्याचा रंग बदललेला नाही, एवढंच काय तर शिवसेना मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेवर केली.

आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे
SHARES

आम्हाला हिंदुत्व (Hindutva) सिद्ध करण्याची गरज नाही, शिवसेनेने कधीही झेंड्याचा रंग बदललेला नाही, एवढंच काय तर शिवसेना मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर केली.

शिवसेना आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी 'सीएए' (caa) आणि 'एनआरसी' (nrc) कायद्याबाबत शिवसेना आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे तसंच मनसेचा थेट उल्लेख न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्ष टीका केली. 

हेही वाचा- तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ- राज ठाकरे

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणाले की, शिवसेनेने (shiv sena) राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेससोबत (congress) मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीका सातत्याने काही जणांकडून करण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केली म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा (hindutva) त्याग केला, असं म्हणणं चुकीचं आहे. शिवसेना हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही.

ते पुढं म्हणाले, मला माझं हिंदुत्व (hindutva) सिद्ध करण्याचीही गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. त्यात जराही खोट नाही. शिवाय जगाला आमचं हिंदुत्व काय आहे, हे माहीत आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही. एक माणूस एक झेंडा हे आमचं सूत्र ठरलेलं आहे. असं असलं तरी आमच्यासाठी महाराष्ट्राचं हित आणि विकास देखील तितकाच महत्त्वाचा आहे, असंही उद्धव (cm uddhav thackeray) यांनी सांगितलं. 

हेही वाचा- शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलीय, मनसेचा पलटवार

दरम्यान पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याच्या मागणीसाठी मनसेने रविवार ९ फेब्रुवारी रोजी गिरगाव हिंदू जिमखाना ते आझाद मैदान महामोर्चा (mns rally) काढला होता. या मोर्चाचं नेतृत्व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मनसैनिक दाखल झाले होते. या मोर्चानंतर केलेल्या भाषणात राज ठाकरे (raj thackeray) यांनी घुसखोरांवर हल्लाबोल केला. भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली की काय? या देशात राहणाऱ्या घुसखोरांना हाकलून साफसफाई करण्याची वेळ आली आहे. आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. पण इथून पुढं दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असं राज म्हणाले. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा