Advertisement

तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ- राज ठाकरे

आज तर फक्त मोर्चाच काढला आहे, जास्त नाटक करालं, तर गप्प न बसता दगडाला-दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी मोर्चे काढणाऱ्यांना इशारा दिला.

तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ- राज ठाकरे
SHARES

आज तर फक्त मोर्चाच (Morcha) काढला आहे, जास्त नाटक करालं, तर गप्प न बसता दगडाला-दगडाने (Stone) आणि तलवारीला तलवारीने (Sword) उत्तर देऊ, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navanirman Sena Chief Raj Thackeray) यांनी सुधारीत नागरिकत्व कायदा (CAA) आणि एनआरसीला (NRC) विरोध करण्यासाठी मोर्चे काढणाऱ्यांना इशारा दिला. आझाद मैदानात (Azad Maidan) केलेल्या भाषणात ते बोलत होते.


देशातील बांगलादेशी (Bangladesh) आणि पाकिस्तानी (Pakistan) घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी मनसेतर्फे रविवारी ९ फेब्रुवारी रोजी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मरिन लाइन्स (Marine lines) येथील हिंदू जिमखाना (Hindu Gymkhana) ते आझाद मैदानादरम्यान (Azad maidan) काढण्यात आलेल्या मोर्चासाठी राज्यभरातून हजारो मनसैनिक सहभागी झाले होते. या मोर्चाचं नेतृत्व स्वत: राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्यासोबत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आदी नेते उपस्थित होते.


आझाद मैदानात पोहोचल्यावर मोर्चाचं (Morcha) सभेत रूपांतर झालं. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, 


  • पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे. ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच सापडला होता. भारतातल्या दहशतवादी कारवायांमागेही पाकिस्तानचा हात आहे. असं असताना पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूवर अत्याचार होत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानातील मुस्लिमांना भारतात नागरिकत्व देण्याची काय गरज? माझा देश काय धर्मशाळा आहे का? दरवेळेस माणुसकीचा ठेका भारतानं घेतलेला नाही.


  • सीएए आणि एनआरसीवरून देशभरात मुस्लिमांनी मोर्चे काढले. मला या मोर्चांचा अर्थच लागत नाही. या देशातील मुस्लिमांना कोण हाकलणार आहे. कायद्याबद्दल माहिती नसणारेही बोलत आहे? आपल्या देशात सध्या उजवा किंवा डावा इतकंच सुरू आहे. इथला आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीयांकडून कुणी कागदपत्रे मागितली. ते तर भारतात राहणारे आहेत. त्यांना या देशातून कोण काढणार आहे?


  •  मी जे चांगलं त्याला चांगलं म्हणालो. जे वाईट होतं त्याच्यावर टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयावर मी टीका केली, त्यावेळी मला भाजप विरोधक ठरवण्यात आलं. आता सीएएच्या बाजूने बोललो तर भाजपचं समर्थक ठरवलं जात आहे. 


  • पण आता, आता देशात सफाई करण्याची वेळ आली आहे. आता तर नायजेरियनही येऊ लागलेे आहेत. बाहेरून आलेले घुसखोर आपल्या मुलींची छेड काढतात आणि आपण षंढासारखे बघत बसतो, पोलिसांचे हातही कायद्यात बांधलेले असतात. उद्या हेच तुमच्यावर हात उचलतील. बाहेरून आलेल्या लोकांमुळे देशात बॉम्बस्फोट, दंगली होत आहे. इथं महाराष्ट्रात राहणाऱ्या आपल्या मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाही. यांना वठणीवर आणयचं असेल, तर पोलिसांचे हात ४८ तासांसाठी मोकळे सोडा, असं माझं केंद्र सरकारला आवाहन आहे. 


  • त्यामुळे मोर्चे काढणाऱ्यांनी आजचा मोर्चा बघावा आणि एकोप्यानं राहावं. नाहीतर इथून पुढे दगडाला दगडानं आणि तलवारीला तलवारीनं उत्तर देऊ, असं राज ठाकरे म्हणाले.हेही वाचा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान

आम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरेसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा