Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांचा बालमोहन विद्यामंदिर शाळेत होणार सन्मान
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दादर मधील बालमोहन विद्यामंदीर शाळेत सन्मानित करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे व जयंत पाटील हे दोघही बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळं शाळेकडून दोघांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

सोमवारी दुपारी १२ वाजता सुमारास बालमोहन विद्यामंदिर शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे साल १९७६ व जयंत पाटील १९७७ या सालामधील शाळेचे विद्यार्थी आहेत. एक मुख्यमंत्री तर, दुसरा कॅबिनेट मंत्री असणं ही कोणत्याही शाळेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 

बालमोहन विद्यामंदिर शाळेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांचे वर्गमित्र व नाट्यनिर्देशक अजित भूरे प्रश्न विचारणार आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा