Advertisement

मिरा भाईंदर ते डोंबिवली दरम्यान करा पाण्यातून प्रवास

जलवाहतुकीच्या मदतीनं येत्या दोन वर्षांत मीरा-भाईंदर ते डोंबिवलीपर्यंतचा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होईल

मिरा भाईंदर ते डोंबिवली दरम्यान करा पाण्यातून प्रवास
SHARES

वाहतूक कोंडिवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं आता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून आता मिरा भाईंदर ते डोंबिवलीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पानंतर मुंबईचे पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर खाडीमार्गे जाेडले जाईल


प्रकल्पासाठी 'इतका' खर्च

भाईंदरच्या जेटीवरून निघालेली कॅटमरान डोंबिवलीत अगदी कमी वेळेत पोहोचेल. येत्या दोन वर्षांत मीरा-भाईंदर ते डोंबिवलीपर्यंतचा प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होईल. याबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे सरकारमधील वस्त्रोद्योग आणि बंदर विकास मंत्री असलम शेख म्हणाले की, जलवाहतुकीच्या माध्यमातून हा प्रवास अवघ्या ४० मिनिटात शक्य होणार आहेप्रत्यक्षात हे स्वप्न लवकरच साकारलं जाईल. मीरा-भाईंदर ते डोंबिवली जलमार्गापर्यंत जेट्टी (प्लॅटफॉर्म) तयार करण्यासाठी येत्या  महिन्यांत ८६ कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.


इथं थांबेल?

मुंबई-अलिबाग जलवाहतुकीसाठी सध्या कॅटमरान प्रवासी वाहतूक सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर भाईंदर ते डोंबिवलीपर्यंत ही वाहतूक सेवा सुरू होईल. एका लाँचमधून किमान १०० प्रवासी प्रवास करू शकतील. चार ठिकाणी या कॅटमरानला थांबा देण्यात आला आहे. कोलशेत, काल्हेर, गायमुख यासह ४ स्थानके असतील.


वेळेची बचत

मीरा-भाईंदर ते डोंबिवलीपर्यंतचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर ते डोंबिवली दरम्यान राहणाऱ्या लोकांना वाढत्या वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार असल्याचं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या काळात मीरा-भाईंदर ते डोंबिवलीपर्यंत जाण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात. तथापि, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही वेळ ४० मिनिटांपर्यंत कमी केली जाईल.


पर्यटनाला चालना

प्रकल्पामुळे पर्यटनालाही चालना मिळेल, असं अस्लम शेख म्हणाले. जलमार्गाचा उपयोग केल्यास ३३ टक्के इंधनाची बचत होईल आणि प्रदूषण सुमारे ४२ टक्क्यांनी कमी होईल.



हेही वाचा

शिवनेरी, शिवशाही, बससेवाकडून सर्वाधिक नियमांचे उल्लंघन

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा