Advertisement

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर आहे. त्यामुळं सर्वच ठिकाणी प्रीपेड रिक्षा सुरू व्हायला हवी, असे मत परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी व्यक्त केलं आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर
SHARES

मुंबई लोकल (Local) आणि बेस्ट बस (Best Bus) पाठोपाठ काळी-पिवळी टॅक्सी (Taxi) ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा (Public Transport) कणा आहे. या टॅक्सीनं थोडे जास्त पैसे मोजून प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येतो. प्रवाशांना या टॅक्सीच्या माध्यमातून आणखी चांगली सुविधा मिळावी यासाठी, प्रीपेड स्टॅण्ड सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड (Prepaid taxi stand) फायदेशीर आहे. त्यामुळं सर्वच ठिकाणी प्रीपेड रिक्षा सुरू व्हायला हवी, असे मत परिवहन आयुक्त शेखर चन्ने (Transport Commissioner Shekhar Channe) यांनी व्यक्त केलं आहे. 

'प्रीपेड रिक्षा-टॅक्सीमुळं प्रवाशांना प्रवासाचं साधन लवकर उपलब्ध होतं. प्रीपेड वाहनचालकाची सर्व माहिती प्रवाशाला मिळते. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येतो. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना प्रीपेड स्टॅण्डमध्ये मीटरपेक्षा २५ टक्के अधिक भाडं मिळतं. चालकांचाही फायदा होतो. मुंबईत नव्या टॅक्सींच्या छतावर दिवे लावण्यात येत आहेत. जुन्या टॅक्सीसंदर्भात टॅक्सी युनियनसोबत बैठक झाली असून ते सकारात्मक आहेत', असं परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी म्हटलं.

लवकरच जुन्या टॅक्सीवर (Old Taxi) दिवे लावण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) इथं शनिवारी प्रीपेड रिक्षा स्टॅण्ड सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे रेल्वे स्थानकाबाहेरील (Railway Station) एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद करण्यात आला आहे. यासाठी आरटीओ आणि रेल्वेमध्ये समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी टॅक्सी-रिक्षा युनियनन केला होता.

लोकमान्य टिळक टर्मिनस इथं मेन्स टॅक्सी युनियनचे (Men's Taxi Union) प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरू होते. पण स्टॅण्डबाहेरील वाहनांमुळं प्रवाशांच्या संख्येत घट झाली. त्यामुळं हे प्रीपेड स्टॅण्ड काही दिवस बंद होते. आता प्रीपेड टॅक्सी स्टॅण्डचा परवाना नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रीपेड स्टॅण्ड सुरळीत चालण्यासाठी रेल्वे, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी सहकार्य करावे, अशी मागणी मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रॉक्स (Men's taxi union leader A. L. Quadrox) यांनी केली आहे.

प्रीपेड रिक्षा आणि टॅक्सी स्टॅण्डसाठी (Prepaid Rickshaw-Taxi Stand) आरटीओ (RTO) तयारी होती. पूर्वी पासून प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड सुरु होते. मात्र, रेल्वेनं स्टॅण्डची जागा काढून घेतली होती, जागेचे पैसे देण्याची मागणी केली होती. आरटीओनं रेल्वे प्रशासनांसोबत चर्चा केली असून, आता रेल्वेनं धोरणात बदल केला आहे.

मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासन जागा देण्यास तयार झाले आहे. त्यामुळे दादर, कुर्ला, कल्याण, पनवेल आदी ठिकाणी प्रीपेड रिक्षा टॅक्सी स्टॅण्ड (Prepaid Rickshaw-Taxi Stand) सुरु होणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेकडून प्रीपेड स्टॅण्डसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही.हेही वाचा -

तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ- राज ठाकरे

शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलीय, मनसेचा पलटवारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा