Advertisement

महापालिका मुंबईकरांना देणार सायकल सेवा

मुंबईत सार्वजनिक दुचाकी (सायकल) सामायिकीकरण यंत्रणा (पीबीएस) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका मुंबईकरांना देणार सायकल सेवा
SHARES

मुंबईत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणा वाढली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळं जागोजागी होणारी वाहतुककोंडी (Traffic) निर्माण होते. वाहतुककोंडीमुळं प्रदूषणात (Pollution) वाढ होते. परिणामी, नागरिकांना सामस्यांना (Issues) समोरं जावं लागतं. त्यामुळं या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं (BMC) मुंबईत सार्वजनिक दुचाकी (सायकल) सामायिकीकरण यंत्रणा (पीबीएस) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून १ लाख सायकली (Cycle) महापालिका उपलब्ध करणार आहे. त्यामुळं वाहतुककोंडीची शक्यता कमी होईल. 

मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्याचप्रमाणं वाहनांमुळं मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात भर पडत असते. ही बाब लक्षात घेत महापालिकेनं (BMC) मुंबईत सार्वजनिक सायकल सामायिकीकरण यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक दुचाकी सामायिकीकरण यंत्रणा राबविण्यासाठी काही कंपन्यांची (Company) नेमणूक करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

हेही वाचा - शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र, सुधीर मुनगंटीवार

या योजनेसाठी दुचाकी (Two-wheeler) क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे. तसंच, जाहिरात प्रदर्शित करण्याबाबत स्वतंत्र कंत्राटे देऊन त्याद्वारे महसूल उभा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. या यंत्रणेद्वारे (Mechanism) नागरिकांना पेडल तसंच, बॅटरीवर चालणाऱ्या सायकली (Cycle) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या वर्षी दुचाकी उभ्या करण्याकरिता भाडे अथवा शुल्क घेण्यात येणार नाही.

या यंत्रणेचा वापर करताना दुचाकीस्वारांना विमा संरक्षण (Insurance protection) देण्याची जबाबदारी ही योजना राबविणाऱ्या कंपनीवर सोपविण्यात येणार आहे. तसंच, कंपनीला दुचाकींची नियमित देखभालही करावी लागणार आहे. नेमणूक केलेल्या कंपनीला ही यंत्रणा राबवावी लागणार आहे.

सार्वजनिक दुचाकी सामायिकीकरण यंत्रणेबाबत महापालिका (BMC) प्रशासनानं सभागृहात प्रस्ताव मांडला आहे. परंतु, अद्याप या प्रत्सावाला सभागृहाची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळं सभागृहानं या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यास ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

केंद्राच्या एनआयए संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ – गृहमंत्री

आजपासून धावणार मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा