Advertisement

घाटकोपरच्या 'या' पार्कमध्ये बसवणार १६४ वर्षांच्या जुन्या तोफा!

या दोन्ही लोखंडी तोफा सुमारे १६४ वर्ष जुन्या आहेत. अद्याप त्यांची स्थिती चांगली असल्याचं समजत आहे.

घाटकोपरच्या 'या' पार्कमध्ये बसवणार १६४ वर्षांच्या जुन्या तोफा!
SHARES

नव्यानं मंजूर झालेल्या योजनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका घाटकोपरच्या लायन्स पार्कमध्ये असलेल्या ब्रिटीश कालीन २ ऐतिहासिक तोफा ठेवण्यात येणार आहेत.

या दोन्ही लोखंडी तोफा सुमारे १६४ वर्ष जुन्या आहेत. अद्याप त्यांची स्थिती चांगली असल्याचं समजत आहे. या दोन्ही तोफांच्या एका बाजूला ‘एनसीपीसी’ असे शिलालेख आहे.

त्याचप्रमाणे, प्रशासन अलीकडेच शहरभरातील ऐतिहासिक मैलाचे दगड पुनर्संचयित करण्याचा प्रस्ताव घेऊन आली आहे.

तोफांचे सुशोभीकरण / जीर्णोद्धार करण्यासाठी २० लाख रुपये खर्च असेल. तर प्रशासनानं एका तोफखानावर तोफ पूर्ववत करण्यासाठी पालिकेच्या हेरिटेज कन्सर्वेशन अभियंता यांना प्रस्ताव पाठवला आहे.

महानगरपालिकेच्या मते, तोफ ईस्ट इंडिया कंपनीतर्फे स्थापित करण्यात आल्या आणि कथितपणे १८५६ मध्ये तयार करण्यात आल्या. गंमतीची बाब म्हणजे शहराला घुसखोरांपासून वाचवण्यासाठी या तोफ त्यावेळी लावल्या गेल्या होत्या.

शहरातील खोदकामांच्या कामांमध्ये अनेक तोफ आणि इतर ब्रिटीशकालीन अवशेष सापडले आहेत. काही इतिहासकारांनी असं म्हटलं आहे की, तोफांना विना-कार्यात्मक समजल्यानंतर ते समुद्रात सोडले गेले असावेत.

१९७१ पासून लायन्स पार्क सार्वजनिक अभ्यागतांचे स्वागत करत आहे. हिरवळ म्हणून परिचित असलेलं हे पार्क घाटकोपरमधील ५५ हजार ८४३ चौरस फूट क्षेत्र आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा