Advertisement

महापालिकेची नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई


महापालिकेची नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुंबईत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर सर्वच ठिकाणी कडक बंद पाळण्यात आला. परंतु, मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळु नियंत्रणात येऊ लागल्यावर राज्य सरकारनं लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळं, मुंबईतील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. गरजेविना घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळं मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी, नागरिकांच्या रस्त्यावर होणाऱ्या गर्दीमुळं पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाणसामानाच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत असल्यानं कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिका शर्तीचे प्रयत्न करत असून, महापालिकेच्या के पश्चिम वॉर्डनं नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. तोंडावर मास्क न लावणारे आणि रस्त्यावर थुंकणारे नागरिक महापालिकेच्या रडारवर आहेत.  अशाप्रकारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पालिका प्रशासनाने मुंबईतील २४ सहाय्यक आयुक्तांना मागील २९ जूनपासून दिले आहेत. 

के पश्चिम वार्डमध्ये मागील ३ दिवसांत विविध ठिकाणी नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून सुमारे २४००० दंड वसूल करण्यात आला आहे. तब्बल १० लाख लोकसंख्या असलेल्या के पश्चिम वार्डमध्ये विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हे मोठे भाग पडतात. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा