शिवडीतल्या 'लोढा अरिया' इमारतीवर पालिका करणार कारवाई

  Sewri
  शिवडीतल्या 'लोढा अरिया' इमारतीवर पालिका करणार कारवाई
  मुंबई  -  

  शिवडी पश्चिम येथील 'लोढा अरिया' या 16 मजली पंचतारांकित इमारतीतील बेकायदा बांधकामाबद्दल महापालिकेने सोसायटीला नोटीस बाजावली आहे. या नोटीशीद्वारे 30 मे 2017 पर्यंत बांधकाम हटविण्याची मुदत देण्यात आली आहे. सोसायटीने हे बांधकाम न हटवल्यास या इमारतीवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

  लोढा समूहाने 2009 मध्ये बांधलेल्या या इमारतीत 2015 मध्ये बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात आली होती. त्यानंतर पालिकेने सोसायटीला नोटीस बजावून पोलिसांकडे गुन्हा दाखल केला. या कारवाई विरोधात सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सोसायटीने इमारतीचा नवा आराखडा पालिकेला सादर करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. सोसायटीने नुकताच पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला नवा आराखडा सादर केला. मात्र मंजूर चटई क्षेत्र निर्देशांक पूर्णपणे वापरले असल्याने हे बांधकाम अधिकृत करता येणार नसल्याची भूमिका इमारत प्रस्ताव विभागाने घेतली. त्यानुसार सोसायटीला 30 मे 2017 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या इमारतीतील बेकायदा बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

  लोढा अरियामधील बेकायदा बांधकाम -
  तळ मजला, पार्टी हॉल, वाचनालय, पेन्ट्री, बाथरूम, दुसरा मजला, थिएटर, सोसायटी कार्यालय, स्पोर्ट्स रूम, ड्रायव्हर रूम

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.