Advertisement

मुंबईत 'रिसायकलिंग'! ४० ठिकाणी होणार सायकल ट्रॅक


मुंबईत 'रिसायकलिंग'! ४० ठिकाणी होणार सायकल ट्रॅक
SHARES

मुंबईतील मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसा खुळखुळा लागला, तशी बुडाखालची सायकल जाऊन त्याजागी बाईक किंवा कार आली. पण आता रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे खुद्द मुंबईकरच त्रस्त झाले आहेत. या वाहतूककोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबईत ४० ठिकाणी सायकल ट्रॅक बनवण्याची घोषणा मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना केली.

यापैकी तानसा जलवाहिनीलगत सायकल ट्रॅक बनवण्याच्या कामाला सुरूवात झाली असून पूर्व-पश्चिम तसेच दक्षिण-उत्तर दिशांनी मुंबईला कमीत कमी वेळेत
जोडणारा हा मुंबईतील पहिला ट्रॅक असणार आहे. या ट्रॅकला ४० एण्ट्री-एक्झिट पाॅईंट असतील, असंही मेहता यांनी स्पष्ट केलं.


कुठे जोडणार?

मध्य रेल्वेच्या १०, पश्चिम रेल्वेच्या ५, हार्बर रेल्वेच्या ४, मेट्रो रेल्वे मार्गाच्या ७ आणि मोनो रेल्वेच्या २ स्थानकांना तसंच लोकमान्य टिळक व वांद्रे टर्मिनस यांच्यासह पश्चिम द्रूतगती व मुंबई आग्रा महामार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग यांनाही हे ट्रॅक जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सायकलस्वारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सोईस्कर लाभ घेता येईल.


बंदिस्त मार्गिका

सायकल चालकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत मार्गिका बंदिस्त स्वरुपाची करण्यात येणार आहे. तसंच सायकल पार्किंगचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मुलुंडच्या सीमारेषेपासून सील्वरबेल सोसायटी आणि निटी गेट ते विजय नगर पूल याठिकाणी प्रायोगिक तत्वावर कामाला सुरुवातही झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा