कचऱ्यामुळे दहिसरमधील नागरिक त्रस्त

 Mumbai
कचऱ्यामुळे दहिसरमधील नागरिक त्रस्त

दहिसर - जागोजागी साचलेल्या कचरा आणि मलब्याच्या ढीगाऱ्यामुळे एसएन दुबे रोड इथल्या म्हाडा कॉलनीतले रहिवासी त्रस्त झाले आहेत. कित्येक दिवस झाले तरी पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केला आहे.

एसएन दुबे रोड इथल्या म्हाडा कॉलनी परिसरात पालिकेचं काम सुरू होतं. याच दरम्यान गटाराचं झाकण तुटल्यानंतरही पालिकेने त्याची दुरुस्ती केली नाही. इतकच नाही तर तिथे पडलेला मलबाही पालिकेनं उचलला नाही. याच परिसरात सरदार वल्लभभाई पटेल ही शाळा असल्याने विद्यार्थीही प्रचंड त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी पालिकेच्या आर उत्तर विभागाचे अधिकारी योगेश सावंत यांच्याकडे विचारणा केली सध्या सर्वजण पालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments