स्वच्छता अभियान दौड

 Kandivali
स्वच्छता अभियान दौड
स्वच्छता अभियान दौड
स्वच्छता अभियान दौड
See all

कांदिवली - महापालिकेच्या स्वच्छता प्रबोधन अभियानांतर्गत रविवारी कांदिवलीत स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले. कांदिवलीतल्या अथर्व कॉलेजपासून ते एस. व्ही. रोडपर्यंत या दौडचे आयोजन करण्यात आले. या स्वच्छता अभियान दौडमध्ये प्रत्येक वार्डमधील नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी सहभाग घेतला. या दौडमध्ये नगरसेविका गीता यादव यांच्या कार्यकर्त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आर दक्षिण महापालिकेचे सहआयुक्त साहेबराव गायकवाड यांनी या दौडचे आयोजन केले होते. यात विविध सामाजिक संस्था, एनएसएसचे विदयार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या दौडच्या माध्यमातून जागोजागी स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत जनजागृती केली. यावेळी खास रथाचेही आयोजन करण्यात आले होते.

Loading Comments