गिरगावमध्ये अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाई

 Girgaon
गिरगावमध्ये अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाई
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव - ठाकूरद्वार परिसरातील झावबावाडी येथील अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाई करत सोमवारी पालिकेने संपूर्ण बांधकाम तोडले. ही कारवाई करण्यासाठी साई मंडळ आणि शिवसैनिकांचा विरोध होता. त्या निषेधार्थ सोमवारी सकाळी मोर्चाही काढण्यात आला होता. 

मुंबईतील अनेक अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि सहाय्यक आयुक्त राम चव्हाण यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. या भागात साई श्रद्धा इमारतीचे प्रवेशद्वार असल्याने ये-जा करताना त्रास होत होता. त्यामुळे इथल्या राहिवाशांनी याबाबत तक्रार केली असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता के. एस. म्हात्रे यांनी दिली.

Loading Comments