Advertisement

महापालिकेच्या जीवरक्षकांनी दिले तिघांना जिवनदान


SHARES

मालाडमधील अक्सा समुद्र किनाऱ्यावर पाण्यात बुडत असलेल्या तीन जणांना मुंबई महापालिकेच्या जीवरक्षकांनी वाचवल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शेख अल्ताफ मोहम्मद इरफान (30), सरफराज शेख रहिम शेख (24) आणि सूरज गणेश प्रसाद (25) हे तीन जण मंगळवारी मालाड येथील अक्सा बीच येथे गेले होते. किनाऱ्यावर काही वेळ घालवल्यानंतर त्यांनी समुद्रात पोहण्याचे ठरवले. त्यानुसार तिघेही पाण्यात उतरले. 

मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसेच समुद्राला आलेल्या भरतीमुळे हे तिघेही जण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा समुद्रकिनाऱ्यावर नेमण्यात आलेल्या मुंबई महापालिकेच्या नथुराम सुर्यवंशी आणि स्वतेज कोळंबकर या दोन जीवरक्षकांनी ऐकला. या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता जीवरक्षक उपकरणांसह बुडणाऱ्या तिघांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. वाचवण्यात आलेल्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख रहांगदळे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा