Advertisement

उन्हाळी सुट्टीपूर्वी महापालिकेचे तरण तलाव बंद


उन्हाळी सुट्टीपूर्वी महापालिकेचे तरण तलाव बंद
SHARES

मुंबई - मुंबईतील तरण तलावांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापलिकेची तरण तलावे बंद आहेत. अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलातील तरण तलावांसह शिवाजीपार्क, चेंबूर,घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणांची तरण तलावे बंद आहेत. येत्या काही दिवसांमध्ये शाळांना सुट्टया पडणार आहेत. त्यामुळे तरण तलावेच बंद असल्यामुळे उन्हाळी सुट्टींमध्ये सर्वसामान्य शाळकरी मुलेही पोहोण्यापासून वंचित राहण्याची भीती महापालिका सभागृहात पारदर्शकतेचे पहारेकरी असलेल्या भाजपाने व्यक्त करत शिवसेनेवर कुरघोडी केली.

राजे शहाजी क्रीडा संकुलातील खर्चाच्या लेखशीर्षाच्या प्रस्तावावर बोलतांना भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानच्यावतीने अंधेरी राजे शहाजी क्रीडा संकुलातील तरण तलाव आणि शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव चालविल्या जातात. पण ही दोन्ही तलाव बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. तसेच मुलुंड येथील तरण तलावही एक दिवसाआड बंद असते त्यामुळे ललित क्रीडा व कला प्रतिष्ठानच्यावतीने या तलावांची योग्य देखभाल केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य घटनेला बगल देत प्रतिष्ठानच्यावतीने अधिक खर्च केला जात आहे. त्यामुळे हे एकप्रकारे आपण सफेद हत्ती पोसत आहोत. प्रतिष्ठानकडून योग्य देखभाल होत नसल्यामुळे वारंवार महापालिकेला खर्च करावे लागते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेची बदनामी होत आहे. जर ही तलावे बंद राहिली तर सर्वसामान्याच्या मुलांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे प्रतिष्ठानच्या विश्वस्तांवर अंकुश ठेऊन ही तरण तलावे मुलांना उन्हाळी सुट्टी पडण्याआधी सुरू व्हावीत, अशी आग्रही मागणी मनोज कोटक यांनी सभागृहात केली होती.

यावेळी माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांनी कांदिवलीतील महापालिकेचे सरदार तरण तलाव नूतनीकरणाच्या नावाखाली अद्यापही बंद असल्याचे सांगितले. तर चेंबूरमधील तरण तलाव बंद असल्याची कैफियत शिवसेना नगरसेवक अनिल पाटणकर यांनी मांडली. ललित क्रीडा व कला प्रतिष्ठान हे खेळापेक्षा व्यवसाय करण्यातच गुंतले असल्याचा आरोप करत भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी खेळाला प्राधान्य देण्याऐवजी मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहाच्या परिसरात लग्नसराई करून पैसे कमवत आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळावर स्थानिक नगरसेवकाला प्राधान्य देण्यात यावे,अशी सूचना गंगाधरे यांनी केली. कोट्यवधी रुपये खर्च करूनही तरण तलावे बंद असणे ही गंभीर बाब असून महापौरांनी यासाठी पुढाकार घेऊन तलावे त्वरीत सुरु प्रयत्न करावेत,अशी सचूना माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत तृष्णा विश्वासराव, रंजना पाटील, अभिजित सामंत आदींनी चर्चेत भाग घेतला होता .यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सदस्यांच्या मागणीची दखल घेऊन जिथे जिथे तरण तलाव बंद असतील ते त्वरित सूर करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन सभागृहाला दिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा