Advertisement

आरेतील झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतंही झाड तोडू नये, असं न्यायालयाने तोंडी सांगितलं आहे.

आरेतील झाडांच्या कत्तलीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती
SHARES
Advertisement

मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरे काॅलनीतील झाडांच्या कत्तलीला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतंही झाड तोडू नये, असं न्यायालयाने तोंडी  सांगितलं आहे. याबाबत पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे. 

एकत्रित सुनावणी

आरेमधील २१८५ झाडे तोडण्यासाठी तसंच ४६१ झाडांचं अन्यत्र पुनर्रोपण करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी जोरु बथेना यांच्यासहीत ११३ याचिकांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकांवर मंगळवारी एकत्रित सुनावणी घेण्यात आली.  

न्यायाधीश दौरा करणार

त्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी म्हटलं की, “पर्यावरण विषयक गंभीर प्रकरणात वैयक्तिकरित्या सत्यता पडताळणं गरजेचं असते. त्यामुळे आम्ही वैयक्तिकरित्या आरेचा दौरा करून विरोधाचा मुद्दा तपासणार आहोत.  

आरेतील झाडांच्या कत्तलीविरोधात शिवसेना, मनसे, काँग्रेस-राष्ट्रवादी, आप या राजकीय पक्षांसह सामान्य नागरिक आणि सेलिब्रिटींकडूनही आंदोलनं करण्यात येत आहेत. हेही वाचा-

आरेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेला पाठिंबा

आरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार – आपसंबंधित विषय
Advertisement