Advertisement

आरेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेला पाठिंबा


आरेच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा शिवसेनेला पाठिंबा
SHARES

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आरे काॅलनी अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे आरेला कुठल्याही परिस्थितीत वाचवलं पाहिजे. भलेही शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असतील, तरीही आरेच्या मुद्द्यावर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचं वक्तव्य माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलं. रमेश यांनी मंगळवारी दुपारी आरे काॅलनीत उपस्थित पर्यावरणवाद्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

काय म्हणाले रमेश?

आरे काॅलनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे मी पर्यावरणमंत्री असताना आरेला इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये टाकण्याची माझी भूमिका होती. मेट्रो ३ साठी आरेत होणारं कारशेड लहानसहान नाहीय. ते इथं बनल्यास आरेत काँक्रिकटीकरणाला शिरण्यासाठी दरवाजा खुला होईल.   

शिवसेनेला पाठिंबा

शिवसेनेसोबत भलेही आमची राजकीय लढाई असो, परंतु आरेच्या मुद्द्यावर मात्र मी त्यांना पाठिंबा देईन. मी पर्यावरणमंत्री असताना त्यांनी सामनातून पर्यावरणाच्या मुद्द्यावर मला समर्थन दिलं होतं. पण या मुद्द्यावर आता केवळ बोलणं नाही, तर त्यांनी कृती देखील केली पाहिजे. आरेतील झाडांची कत्तल रोखण्याचा निर्णय घेण्याविषयी त्यांनी मित्रपक्ष भाजपाला समजावलं पाहिजे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मेट्रो ३ प्रकल्प राबवणारी एमएमआरसी आणि एमएमआरडीए प्राधिकरणाने कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेतला पाहिजे, अशी विनंतीही त्यांनी केली.

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेतील २७०० झाडं कापण्याची मंजुरी दिली होती. तेव्हापासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. 



हेही वाचा-

आरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार – आप

आरेतील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कारशेडला मुंबईकरांचा विरोध



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा