Advertisement

आरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार – आप

मेट्रो कारशेड आरेतच उभारण्याचा राज्य सरकारचा आग्रह आहे. त्यामुळं याला तिव्र विरोध करण्यासाठी या विरोधात चिपको चळवळ सुरू करणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या(आप)वतीनं देण्यात आली आहे.

आरेतील जंगल वाचविण्यासाठी चिपको चळवळ सुरू करणार – आप
SHARES

मेट्रो -३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील तब्बल २ हजाराहून अधिक झाडं कापण्यात येणार आहेत. मात्र, या झाडे कापण्याला मुंबईकरांपासून सर्वचजण विरोध करत आहेत. मात्र, मेट्रो कारशेड आरेतच उभारण्याचा राज्य सरकारचा आग्रह आहे. त्यामुळं याला तिव्र विरोध करण्यासाठी या विरोधात चिपको चळवळ सुरू करणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या(आप)वतीनं देण्यात आली आहे.

कारशेड उभारणं अशक्य

'आमचा मेट्रोला विरोध नाही. पण आरेमध्ये कारशेड उभारण्यास विरोध' असल्याचं आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. यावेळी 'मुंबईकरांना आरेमध्ये कोणतीही विकासकामं नकोत. मुंबईला पुरापासून वाचविण्यासाठी आरेतील जंगल जैसे थे ठेवावं. आरेशिवाय इतर ठिकाणी मेट्रो उभीकरणं अशक्य असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांना जर इतर ठिकाणी कारशेड उभारणं अशक्य वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा’, असंही मेनन यांनी म्हटलं आहे.

राजकीयनेत्यांचाही विरोध

मुंबईकरांसोबत अनेक राजकीयनेतेही या कारशेडला विरोध करत आहे. यामध्ये शिवसेनेाचाही समावेश आहे. मात्र, 'शिवसेना आरेबाबत दुटप्पी भूमिका घेत आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत मेट्रोभवनचं उद्घाटन केलं. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं १३ सप्टेंबर रोजी मेट्रोशेड बनविण्यासाठी झाडं तोडण्याची परवानगी दिली. मात्र, १५ सप्टेंबर रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आम्ही एकही झाड तोडू देणार नसल्याचं म्हटलं. हा महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे’, असा आरोपही त्यांनी केला आहे.हेही वाचा -

पावसाचं पाणी साठवण्यासाठी महापालिका करणार भूमिगत जलबोगदे

केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबईत, विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा