Advertisement

पावसाचं पाणी साठवण्यासाठी महापालिका करणार भूमिगत जलबोगदे

मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका मुंबईत भूमिगत जलबोगदे तयार करण्याचा विचारात आहे.

पावसाचं पाणी साठवण्यासाठी महापालिका करणार भूमिगत जलबोगदे
SHARES
Advertisement

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळल्यास सखल भागांत पाणी साचतं. यामुळं रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. अनेकदा पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळं या पूरस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका मुंबईत भूमिगत जलबोगदे तयार करण्याचा विचारात आहे. यासाठी महापालिका जपानी तंत्राची मदत घेत टोकियो शहराच्या धर्तीवर असे जलबोगदे बनवणार आहे. या बोगद्याचा वापर पावसाचं पाणी साठविण्यासाठी करण्यात येणार असून पाणी साठल्यानंत ते पावसाचे पाणी समुद्रात सोडण्याची योजना आहे.

भूमिगत जलबोगदे

टोकियो शहराप्रमाणं मुंबईत भूमिगत जलबोगदे तयार करण्यासाठी जपानमधील संबंधित संस्थेचे अधिकारी व तंत्रज्ञ यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. तसंच, महापालिका अधिकाऱ्यांसमवेत जपानी तज्ज्ञ तलावांचा, नद्यांचा व पाणी साचणाऱ्या परिसरांचा अभ्यास दौरा करून त्याविषयीचा अहवाल सादर करणार आहेत.


पाण्याचा निचरा

मुंबईत पावसाळ्यात काही भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो. त्यामुळं पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक जलद गतीनं करण्यासाठी महानगरपालिकेनं आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यापैकी ब्रिमस्ट्रोवॉड प्रकल्पांतर्गत पंपिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. तसंच, नद्या व नाल्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहेत. मात्र, तरीही मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही. त्यामुळं पालिकेनं आता जपानी तंत्रज्ञान वापर करण्याचं ठरवलं आहे.


अभ्यास दौरा

जपानचे तज्ज्ञ महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पवई, विहार, तुळशी तलाव, मिठी नदी आणि तत्सम भागांचा अभ्यास दौरा करणार आहेत. याचा अहवाल पालिकेला सादर करण्यात येणार आहे. पावसाचं पाणी मोठमोठ्या जलबोगद्यांमध्ये साठविण्याचा प्रकल्प मुंबईत राबवायचा झाल्यास ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’ची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.हेही वाचा -

ग्रँट रोड आणि वांद्रे स्थानकातील पूल बंद

यंदाही आघाडीत मनसे नाही?संबंधित विषय
Advertisement