Advertisement

दादरच्या फूल विक्रेत्यांना झटका, रेल्वे स्थानकाबाहेर बसण्यास हायकोर्टाची मनाई

दादर रेल्वे स्थानक परिसर स्थानकाच्या १५० मीटर परिसरात येत असल्यामुळं न्यायलयानं फेरीवाल्यांना दिलासा देण्यास बुधवारी नकार दिला. त्यामुळं फेरीवाल्यांना अाता दादर रेल्वे स्थानकाबाहेर फुलं विकता येणार नाहीत.

दादरच्या फूल विक्रेत्यांना झटका, रेल्वे स्थानकाबाहेर बसण्यास हायकोर्टाची मनाई
SHARES

दादर स्थानकाबाहेर फूल विक्री करण्यास परवानगी मिळावी यासाठी बॉम्बे हॉकर्स युनियनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हा परिसर स्थानकाच्या १५० मीटर परिसरात येत असल्यामुळं न्यायलयानं फेरीवाल्यांना दिलासा देण्यास बुधवारी नकार दिला. त्यामुळं फेरीवाल्यांना अाता दादर रेल्वे स्थानकाबाहेर फुलं विकता येणार नाहीत.


प्रवाशांचे हाल

दरवर्षी सणासुदीला दादर पश्चिम स्थानकाबाहेर फेरीवाल्यांची फुलं विकण्यासाठी गर्दी होत असते. मात्र फूल विक्रेत्यांमुळं या परिसरातून दादर स्थानकात जाताना प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दादर स्थानकाबाहेर फेरीवाल्यांना फुलं विकण्यास बंदी घातली आहे.



कधी केली होती याचिका?

गेल्या वर्षी म्हणजे १ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने आझाद हॉकर्स युनियन विरुद्ध केंद्र सरकार या केसमध्ये दादर स्थानकाबाहेरील हनुमान मंदिराच्या १०० मीटर परिसरात विक्रेत्यांना फुले आणि पुजेचं सामान विकण्यास परवानगी दिली होती. याच निर्णयाचा आधार घेत, दादर स्थानकाबाहेरील परिसरात फुलं आणि पुजेचं सामान विकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बॉम्बे हॉकर्स युनियननं उच्च न्यायालयात केली होती.


जागा बदलावी लागणार

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी झाली असता, विक्रेत्यांना दादर स्थानकाबाहेरील परिसरात फुलांची विक्री करू नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयामुळं विक्रेत्यांना आता फुलं आणि पुजेचं सामान विकण्यासाठी जागा बदलावी लागणार आहे.



हेही वाचा-

फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर, यांना अभय कुणाचा?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा