Advertisement

केशवसूत उड्डाणपुलाखाली फेरीवाल्यांचा धंदा जोरात


केशवसूत उड्डाणपुलाखाली फेरीवाल्यांचा धंदा जोरात
SHARES

रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या अंतरावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांवर महापालिकेच्या वतीनं कारवाई होत असली तरी दादर रेल्वे स्थानकासह अनेक भागांमध्ये रविवारी खुलेआम धंदा करताना फेरीवाले दिसत होते. दादर रेल्वे स्थानकासमोरील केशवसूत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमध्ये फेरीवाल्यांनी चक्क पथारी पसरली होती. एका बाजुला काही फेरीवाले घाबरून बसलेले असतानाच काही परप्रांतीय फेरीवाले बिनधास्त धंदा करत असल्याने, महापालिकेचे फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दादरमध्ये फेरीवाले बिनधास्त

मागील अनेक महिन्यांपासून फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसू दिलं जात नाही. त्यामुळे फेरीवाल्यांना या परिसरात धंदा करता येत नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून दादरमधील केशव सूत उड्डाणपुलाखालील गाळ्यांमधील भागांमध्ये बिनधास्तपणे फेरीवाले धंदा करताना दिसत आहे.


रविवारी चालतो जोरात धंदा

रविवारी दुपारी याठिकाणी जोरात धंदा सुरु होते. रविवार असल्याने महापालिकेचे अधिकारी व वाहन नसते. परंतु याठिकाणी फेरीवाले बसू नये म्हणून खासगी सुरक्षारक्षकांना नेमण्यात आले आहे. परंतु हे सर्व खासगी सुरक्षारक्षक फेरीवाल्यांसोबतच गप्पा मारत त्यांच्या धंद्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.


महापालिकेचं दुर्लक्ष

आमच्या प्रतिनिधीने काढलेल्या व्हिडियोमध्ये याठिकाणी फेरीवाले कशाप्रकारे धंदा करतात, हे दिसत आहे. येत्या २३ जूनपासून प्लास्टिकबंदी होत आहे. त्यामुळे या प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहिम हाती घेण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. परंतु प्लास्टिक मोहिम हाती घेतानाच फेरीवाल्यांच्या कारवाईकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचे या व्हिडियोतून दिसून येत आहे.


हेही वाचा -

दादरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

मनसेचा पुन्हा अल्टीमेटम! फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा