Advertisement

दादरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

प्लास्टिक पिशव्यांचे विक्रेते खुलेआम फेरीवाल्यांना पिशव्यांची विक्री करून 'एक महिन्यानंतर बंदी आहे, आता वापरा', असं सांगत त्यांच्या हाती पिशव्या थोपवत आहेत. तर फेरीवाले पुढे या पिशव्या ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी आहे कुठे? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दादरमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
SHARES

प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत प्लास्टिक पिशव्या बंद करण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न सुरू झाले. तरी दादरमध्ये आजही फेरीवाल्यांच्या माध्यमातून कमी मायक्राॅनच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्यांचे विक्रेते खुलेआम फेरीवाल्यांना पिशव्यांची विक्री करून 'एक महिन्यानंतर बंदी आहे, आता वापरा', असं सांगत त्यांच्या हाती पिशव्या थोपवत आहेत. तर फेरीवाले पुढे या पिशव्या ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी आहे कुठे? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.


लवकरच अंमलबजावणी

मुंबईत प्लास्टिक बंदीच्या घोषणेनंतरही दादरसारख्या मध्यवर्ती भागामध्ये सर्रास पातळ पिशव्यांची विक्री सुरु आहे. फेरीवाल्यांना कारवाईची भीती उरलेली नाही. त्यामुळेच फेरीवाले आणि त्यांना पिशव्यांचा पुरवठा करणारे खुले आम विक्री करताना दिसत आहे. महापालिका प्लास्टिक बंदीबाबत धोरणात्मक कारवाईचं धोरण तयार करत असून त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांमध्ये केली जाणार आहे.



महापालिकेकडे अधिकार

सन २००६ मध्ये आलेल्या अधिसुचनेनुसार मुंबईत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पातळ पिशव्यांवर बंदी असून त्यावर कारवाई करण्याचे सर्व अधिकार महापालिकेकडे आहेत. त्यामुळे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करण्यास बंदी असतानाही त्यावर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.


१ महिन्यात विल्हेवाट

सरसकट सर्वच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक उत्पादकांना, पुरवठाधारक यांना १ महिन्यात विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. त्याचा आधार घेत आजही प्लास्टिक पिशव्यांचे वितरक व पुरवठाधारक हे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करत आहेत. परंतु यावर महापालिकेकडून कारवाई होणं आवश्यक असल्याचं मत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केलं जातं.



पिशवी विक्रेत्यांकडून दबाव?

दादरमधील काही फेरीवाले पातळ पिशव्यांचा वापर करण्यास नकार देत असले तरी प्रत्यक्षात प्लास्टिक पिशव्यांचे विक्रेत हे फेरीवाल्यांच्या हाती या पिशव्या ठेवून त्याचा वापर करण्यास भाग पाडत आहेत. त्यामुळे नक्की प्लास्टिक पिशव्यांसह संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोलवरील बंदी आहे कुठे? असा सवाल दादरकरांकडून व्यक्त होत आहे.


कारवाई करा

शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनीही दादरमध्ये होणाऱ्या पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या बेसुमार वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. महापालिकेने सरसकट प्लास्टिकवर बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. परंतु ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पातळ पिशव्यांवर बंदी घालण्याचे अधिकार हे महापलिकेकडे आहेत. त्यामुळे धोरण बनण्याची वाट न पाहता दादरमध्ये ज्या पातळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरु आहे, त्यावर महापालिकेला असलेल्या अधिकारान्वये कारवाई करावी, अशी मागणी सरवणकर यांनी केली आहे.



हेही वाचा-

प्लास्टिक बंदीचा दिव्याखाली अंधार.!

यापुढे प्लास्टिक वापराल तर, होईल ३ महिन्यांची शिक्षा!



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा