Advertisement

पाकिस्तानी कलाकार पुन्हा इंडियन सिनेमात काम करणार?

केंद्र सरकारने कायदेशीर अधिसूचना जारी करून पाकिस्तानी कलाकारांना काम देण्यावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी याचिका भारतीय कलाकार फैझ अनवर कुरेशी यांच्याकडून करण्यात आली होती.

पाकिस्तानी कलाकार पुन्हा इंडियन सिनेमात काम करणार?
SHARES

पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. भारतीय कलाकार फैझ अनवर कुरेशी यांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदीची याचिका दाखल केली होती. पण उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. 

देशातील कंपन्या, संस्था किंवा व्यक्तीला आपल्या शेजारी देश पाकिस्तानमधील कोणत्याही कलाकार, कंपन्यांसोबत काम करण्यासाठी किंवा त्यांची सेवा घेण्यापासून रोखलं जावं यासाठी बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका फेटाळली.  

याचिकेतून पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी घालण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि फिरदोश पुनीवाला यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली.

न्यायालयाने म्हटले की, देशभक्त होण्यासाठी विदेशातील आणि विशेषत: शेजारील देशातील लोकांशी वैर बाळगण्याची गरज नाही हे एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे. खरा देशभक्त तो असतो जो नि:स्वार्थी असतो, जो आपल्या देशासाठी समर्पित असतो आणि मनाने चांगला असल्याशिवाय तो होऊ शकत नाही असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.

न्यायालय पुढे म्हणाले, अशा प्रकारची बंदी करण्याची मागणी करणारी याचिका सांस्कृतिक सौहार्द, एकता आणि शांतता वाढवण्याविरोधात असून फार चुकीचं आहे असं खंडपीठाने यावेळी सांगितलं. याचिकाकर्त्याने धोरण तयार करण्याबाबत दिलासा मागितला होता आणि न्यायालय विधीमंडळाला विशिष्ट पद्धतीने ते तयार करण्याचे निर्देश देऊ शकत नाही.

भारत सरकारच्या स्तुत्य सकारात्मक पावलांचा हा परिणाम आहे की पाकिस्तान संघ भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकात सहभागी होत आहे, जे संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि सौहार्द याच्या हितासाठी घेतलेल्या पुढाकाराचे परिणाम आहे. 

सध्याच्या याचिकेत केलेली मागणी सद्भावनेच्या विरुद्ध आहे. असा दावा याचिकेत करण्यात आला आहे पाकिस्तानी कलाकार भारतात येणे हा येथील कलाकारांवर अन्याय आहे, कारण त्यामुळे येथील कलाकारांच्या संधींवर परिणाम होतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कायदेशीर अधिसूचना जारी करून भारतीय नागरिक, कंपन्या आणि कंपन्यांना पाकिस्तानी कलाकारांना काम देण्यावर पूर्णपणे बंदी घालावी. याशिवाय अशा कलाकारांना नोकरी देण्यावर आणि व्हिसा देण्यावर बंदी असावी. सरकारी वकिलांनी याचिकेत सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे काल्पनिक असल्याचे सांगितले. ही याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही.



हेही वाचा

भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

मद्याचे दर वाढणार, सरकारकडून व्हॅटमध्ये मोठी वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा