Advertisement

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेला १६७ वर्ष पूर्ण

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेसेवेला १६ एप्रिलला १६७ वर्ष पूर्ण झाले आहेत. ही पहिली लोकल बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती.

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेला १६७ वर्ष पूर्ण
SHARES

आशिया खंडातील पहिल्या रेल्वेसेवेला १६ एप्रिलला १६७ वर्ष पूर्ण झाले आहेत. ही पहिली लोकल बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली होती. परंतु, कोरोनामुळं करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळं संपूर्ण लोकल सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळं यंदाचा लोकलचा वाढदिवस कुठल्याही समारंभाविना पार पडणार आहे. 

ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पहिल्या रेल्वेचे छायाचित्र, माहिती दिली जाणार आहे. तर प्रवासी संघटनांपैकी काही सदस्य ठाणे स्थानकाला भेट देऊन आठवणींना उजाळा देणार आहेत. १६ एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३५ वाजताच्या सुमारास बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली. ३३.८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ५७ मिनिटे लागली. १४ डब्यांच्या या गाडीत त्यावेळी ४०० प्रवाशांनी प्रवास केला होता.

हळूहळू या सेवेचा विस्तार होऊ लागला. आता मध्य रेल्वेवरील लोकल सेवेचा विस्तार सीएसएमटी ते कल्याण, खोपोली, कसारा, पनवेल तर पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत आहे. प्रत्येक वर्षी रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वेचा वाढदिवस साजरा के ला जातो. ठाणे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर स्टेशन मास्तर कार्यालयाजवळच के क कापला जातो. यावेळी गँगमन, ट्रॅकमन, स्टेशन मास्तर इत्यादींचा सत्कारही करण्यात येतो. परंतु यंदा हा वाढदिवस साजरा करणे शक्य होणार नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळं मुंबईची उपनगरीय लोकल गेले २५ दिवस बंद आहे. ३ मेपर्यंत ती बंदच राहणार आहे. सध्या रेल्वेचे कर्मचारी विलगीकरण डबे, मास्क, सॅनिटायझर बनविण्यात गुंतले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी मालगाड्या, पार्सल ट्रेन चालवल्या जात आहेत. वाढदिवशी या कर्मचाऱ्यांच्या कार्याला रेल्वे प्रशासनाकडून ‘सलाम‘ केला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा