Advertisement

बोरीवली अॅडव्होकेट बार असोसिएशनची निवडणूक संपन्न

बोरीवली एडव्होकेट बार असोसिएशनची निवडणूक मंगळवारी पार पडली. यावेळी एकूण ८५१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बोरीवली एडव्होकेट असोसिएशनचे एकूण २०१८ सदस्य आहेत.

बोरीवली अॅडव्होकेट बार असोसिएशनची निवडणूक संपन्न
SHARES

बोरीवली अॅडव्होकेट बार असोसिएशनची निवडणूक मंगळवारी पार पडली. यावेळी एकूण ८५१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बोरीवली अॅडव्होकेट असोसिएशनचे एकूण २०१८ सदस्य आहेत. परंतु एकावेळी एक मत देण्याच्या निर्णयामुळे केवळ ८५१ मतंच पडली. कोणत्याही एकाच बार असोसिएशनच्या सदस्याला मत देण्याच्या निर्णयामुळे यावेळी मतांची संख्या कमी होती.

राजेश मोरेंची फेरनिवड

यावर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये राजेश मोरे यांची पुन्हा एकदा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर आर.बी.यादव यांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आलं. तर एम.के.गिरी यांची सचिवपदी, मनोज दुबे यांची जॉईंट सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली. संदिप प्रजापती, भालेराव, कंचन चाडंक, सिद्धेश चौगले आणि रंजिता जैन यांना कमिटी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं.

गेल्या वर्षी झालेल्या या बार असोसिएशनच्या निवडणुकांमध्ये एकूण १ हजार १३० मत पडली होती. बार असोसिएशनची निवडणूक मंगळवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडली.
हेही वाचा -

मुंबईची हवा प्रदूषितच; प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉकRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा