Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

मुंबईची हवा प्रदूषितच; प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

दिल्लीच्या हवेचा स्तर खालावत असल्याचं यापूर्वी अनेकदा ऐकिवात आलं होतं. परंतु दिल्लीमागोमाग मुंबईच्याही हवेचा स्तर खालावत चालल्याचीही माहिती सातत्यानं पुढं येत आहे.

मुंबईची हवा प्रदूषितच; प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
SHARES

दिल्लीच्या हवेचा स्तर खालावत असल्याचं यापूर्वी अनेकदा ऐकिवात आलं होतं. परंतु दिल्लीमागोमाग मुंबईच्याही हवेचा स्तर खालावत चालल्याचीही माहिती सातत्यानं पुढं येत आहे. प्रजा फाऊंडेशननं मुंबईतील हवेबाबत एक अहवाल सादर केला आहे. यानुसार २०१८ साली २७९ दिवसांपैकी एकाही दिवशी मुंबईतील हवेचा स्तर चांगला नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. माहिती अधिकारातून प्रजा फाऊंडेशननं हा अहवाल तयार केला आहे.


गुणवत्तेची माहिती नाही

बोर्डच्या वेबसाईटवर २०१८ सालच्या ८६ दिवसांच्या हवेच्या गुणवत्तेची माहिती नसल्याचं प्रजा फाऊंडेशनच्या मिलिंद म्हस्के यांनी सांगितलं. तसंच अहवालानुसार २०१८ सालच्या २७९ दिवसांमधील एकाही दिवशी मुंबईची हवा खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. तर २०१७ मध्ये ४५ दिवस आणि २०१६ मध्ये ६५ दिवस मुंबईची हवा उत्तम असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर २०१८ साली १३८ दिवस, २०१७ मध्ये १३४ आणि २०१६ मध्ये १७७ दिवस मुंबईची हवा चांगली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.


तक्रारींत वाढ

प्रजा फाऊंडेशननं सादर केलेल्या अहवालातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. हवेबाबत महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारींमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. २०१६ साली पालिकेकडे ८१ हजार ५५५ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. तर २०१७ मध्ये ९२ हजार ३२९, तर २०१८ मध्ये १ लाख १६ हजार ६५८ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये पाण्याशी निगडीत तक्रारीही अधिक असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा -

मुकेश अंबानी आता रियल इस्टेटमध्येही करणार धमाका

एअर इंडियाच्या २२ घरांचा लिलाव होणारRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा