Advertisement

एअर इंडियाच्या २२ घरांचा लिलाव होणार

मुंबईतील कफ परेड, वांद्रे, माहिम, प्रभादेवी आणि खार यासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एअर इंडियाच्या २२ घरांचा लिलाव करण्यात येणार आहे. २६ एप्रिल रोजी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे या घरांचा लिलाव करण्यात येणार आहे.

एअर इंडियाच्या २२ घरांचा लिलाव होणार
SHARES

मुंबईतील कफ परेड, वांद्रे, माहीम, प्रभादेवी आणि खार यासारख्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एअर इंडियाच्या २२ घरांचा लिलाव करण्यात येणार आहे. २६ एप्रिल रोजी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे या घरांचा लिलाव करण्यात येणार आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या महालेखाकार कार्यलयासाठी एअर इंडियाचं घर २४.३३ कोटी रूपयांना खरेदी करण्यात आलं होतं.


सरकारी संस्थांसाठी लिलाव

यापूर्वी गेल्या वर्षी एअर इंडियाच्या नरिमन पॉईट येथील इमारतीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच केवळ सरकारी कंपन्यांना त्या ठिकाणी जागा खरेदी करण्याची अट घालण्यात आली होती. परंतु त्यावेळी कोणत्याही खरेदीदारानं जागा खरेदीत रस दाखवला नव्हता. परंतु माहीममधील नवविद्या लक्ष्मी या इमारतीतील ३ बीएचके घरांची ३.१२ कोटींना विक्री करण्यात आली होती. तर याव्यतिरिक्त खारमधील एका ३ बीएचके आणि दोन २ बीएचके घरांची विक्री अनुक्रमे ५.१५ कोटी, ४.२८ कोटी आणि ४.८८ कोटींना करण्यात आली होती.

नरिमन पॉईंट येखे एअर इंडियाची २३ मजली भव्य इमारत आहे. यामध्ये नौवहन महासंचलनाल, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी यांसारख्या कंपन्यांची कार्यालयं आहेत. तर यातील एअर इंडियाचं मुख्यालय २०१३ साली दिल्लीला हलवण्यात आलं होतं.
हेही वाचा -

मुकेश अंबानी आता रियल इस्टेटमध्येही करणार धमाका

आता रेमंड रिअल इस्टेट क्षेत्रात उतरणारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा