Advertisement

बेस्टचा वीज ग्राहकांसाठी 'अभय योजना २०१९'

बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण, बेस्टनं आता बेस्टची वीज वापरणाऱ्यांसाठी अभय योजना आणली आहे. या अभय योजनेच्या अंतर्गत थकीत वीज बिलावरील १०० टक्के व्याज आणि विलंबित आकार रद्द केला जाणार आहे.

बेस्टचा वीज ग्राहकांसाठी 'अभय योजना २०१९'
SHARES

बेस्टची वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कारण, बेस्टनं आता बेस्टची वीज वापरणाऱ्यांसाठी अभय योजना आणली आहे. या अभय योजनेच्या अंतर्गत थकीत वीज बिलावरील १०० टक्के व्याज आणि विलंबित आकार रद्द केला जाणार आहे. त्यामुळं वीज बिल थकवल्यानं वीज मापक काढून टाकण्याची कारवाई झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

अभय योजना लागू

बेस्टनं गेल्या वर्षी आणि यंदाच्या वर्षातही अभय योजना लागू करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही योजना राबवण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर २००६ ते ३१ डिसेंबर २०१५ या दरम्यान वीज देयकाची थकबाकी न भरल्यानं वीज मापक (मीटर) काढण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसंच, या योजनेला 'अभय योजना २०१९' असं नाव देण्यात आलं आहे.

अर्ज योजनेसाठी पात्र

पूर्वीच्या अभय योजनेच्या समाप्तीनंतर म्हणजेच ३१ मार्च २०१९ ते ९ जुलै २०१९ या कालावधीत प्राप्त झालेले अर्जदेखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रभागाच्या विभागीय अभियंता ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याचं आवाहन बेस्टकडून करण्यात आलं आहे.

याआधी १ फेब्रुवारी २०१८ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत बेस्टनं अभय योजना २०१८ राबवली होती. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत पुन्हा एकदा ही योजना राबवली. आता १० जुलै २०१९ ते ९ जुलै २०२० दरम्यान अभय योजना राबवण्यात येणार आहे.



हेही वाचा -

दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिजवान कासकरला अटक

कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महापालिका सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा