ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित

वडाळा - तोफ. अंगावर काटा आणणारा हा शब्द. अगदी अलीकडे कारगिलच्या युद्धातही बोफोर्स तोफांनी आपला विजय सोपा केला होता. पण मुंबईत एका रस्त्यावर तोफा धूळ खात पडल्यायत, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? वडाळा वसाहतीतल्या एका रस्त्यावर चार टनाच्या दोन तोफा पडल्या आहेत. या तोफांनी कधी काळी काय पराक्रम गाजवलाय, याचीही काही माहिती उपलब्ध नाही.

या तोफांची माहिती मिळावी यासाठी मुंबई लाइव्हने मुंबई पोर्ट ट्रस्टचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनायक जोगळेकर यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी याबाबत अधिकृतरित्या काहीही माहिती देणं शक्य नसल्याचं सांगितलं. या परिस्थितीत ऐतिहासिक ठेव्याचं जतन आपण करणार का? हाच प्रश्न आहे.

Loading Comments