Advertisement

बोरिवलीत 3 मजली इमारत कोसळली


बोरिवलीत 3 मजली इमारत कोसळली
SHARES

मुंबईतील बोरिवली परिसरातील वझिरा नाका परिसरात तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली 4-5 गाड्या दबल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील वजीरा नाका, प्रणय नगर येथील धोकादायक स्थितीतील 3 मजली इमारत होती. या धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू असतानाच इमारतीचा एक भाग बाजूला असलेल्या रस्त्यावर कोसळला. त्या ठिकाणी चार ते पाच चारचाकी गाड्या उभ्या होत्या.

रस्त्यावर उभ्या वाहनांवर मलबा कोसळल्यामुळे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

खाजगी इमारतीचे कंत्राटदारामार्फत पाडकाम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी इमारतीच्या कंत्राटदाराचा निष्काळजीपणा दिसून येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परंतु कंत्राटदाराने निष्काळजीपणा केला आहे का, याचा तपास सध्या अग्निशमन दल आणि बोरिवली पोलीस करत आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.हेही वाचा

सीटबेल्ट नियम टॅक्सी संघटनांना अमान्य

मुंबईकरांनो लक्ष द्या! लवकरच, नरिमन पॉइंट ते विरार दरम्यान 1 तासात प्रवास करू शकाल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा