Advertisement

सीटबेल्ट नियम टॅक्सी संघटनांना अमान्य,

काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो.

सीटबेल्ट नियम टॅक्सी संघटनांना अमान्य,
SHARES

वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांमध्ये येत्या १ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट सक्ती केली आहे. पण या निर्णयाला मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने विरोध केला आहे. मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केंद्रीय मोटर वाहन नियमच अमान्य असल्याचे म्हणत मुंबईच्या सह पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

सीटबेल्ट धोरण अंमलबजावणीची काळ्या-पिवळ्या टॅक्सीशी तुलना करु नये. यामध्ये अनंत अडचणी तसेच काही मुद्देही असून याची अंमलबजावणी होणे अशक्य असल्याचेही स्पष्ट केले आहे.

केंद्रीय धोरणाने खासगी टॅक्सीशी तुलना करु नये, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने मुंबई सह पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. मुंबई महानगरात टॅक्सीच्या अपघाताचे प्रमाण हे शून्य आहे. शहरात वाहनाचा सरासरी वेग हा १२ किलोमीटरपेक्षाही कमी आहे. हे मुद्दे विचारात घेता मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करु नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी या मुंबई महानगरातच अधिक धावतात. त्यातून प्रवास करणारा प्रवासी हा कमी अंतरावरील असतो. टॅक्सीतून चार प्रवासी प्रवास करतात. तेथे मागील आसनावर बसलेल्या प्रवाशांसाठी दोन सीटबेल्ट दिलेले असतात. मागे बसलेल्या तीन प्रवाशांपैकी मधल्या आसनांवर बसलेल्या प्रवाशानेही सीटबेल्ट बांधणे बंधनकारक केले आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' सहा स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर गगनाला भिडले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा