अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा दुसरा टप्पा सुरू


  • अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा दुसरा टप्पा सुरू
SHARE

डोंगरी - डोंगरीतील 11 केशवजी नाईक रोड येथील अवैध 11 मजली बिल्डिंग तोडण्यास महानगरपालिकेनं काही दिवस आधी सुरुवात केली होती. सध्या बांधकाम तोडण्याचं काम दुसऱ्या टप्प्यात आहे. ही इमारत तोडल्यानंतर या जागेत सध्या तरी कोणतंही बांधकाम करण्यात येणार नसल्याचं समजतंय. त्याचबरोबर या जागेवर पालिका अनधिकृत बांधकामाचा बोर्ड लावणार असल्याचंही समजतंय. या जागेचा संबंध डी गँगसोबत असल्याचंही सांगण्यात येतंय. या जागेचा मालक इब्राहिम मोतीवाला त्या गँगशी जोडलेला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण त्याला पोलिसांकडून स्पष्ट दुजोरा मिळालेला नाही.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या