Advertisement

रेल्वेत नोकरीची संधी! 2409 जागांसाठी भरती जाहीर

मध्य रेल्वेने दोन हजारांहून अधिक पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली

रेल्वेत नोकरीची संधी!  2409 जागांसाठी भरती जाहीर
SHARES

मध्य रेल्वेने दोन हजारांहून अधिक पदांसाठी भरतीची जाहिरात दिली  आहे. उमेदवार अधिकृत साइटद्वारे या पदासाठी अर्ज करू शकतात. रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे प्रशासनाने भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे.

अधिसुचनेनुसार मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांच्या हजारो जागा रिक्त आहेत. उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ सप्टेंबर आहे.

भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेमध्ये नोकरीची ही संधी सुरू केली आहे. रेल्वे अप्रेंटिसच्या 2409 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये मुंबई क्लस्टरमध्ये 1649 पदे, पुणे क्लस्टरमध्ये 152 पदे, सोलापूर क्लस्टरमध्ये 76 पदे, भुसावळ क्लस्टरमध्ये 418 आणि नागपूर क्लस्टरमध्ये 114 पदे रिक्त आहेत.

शिक्षण आणि वय निर्बंध

रेल्वेच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करताना, उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्रही असायला हवे.



हेही वाचा

मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार 'पेशंट हेल्प डेस्क'!

BMC वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 27% डॉक्टरांची कमतरता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा