बस स्टॉप की गोदाम?

 Dharavi
बस स्टॉप की गोदाम?
बस स्टॉप की गोदाम?
बस स्टॉप की गोदाम?
बस स्टॉप की गोदाम?
See all

कुंभारवाडा - येथील बस स्टॉपवर सिमेंटच्या गोण्या, पेवरब्लॉक आदी बांधकामाचे सामान ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हा बस स्टॉप कमी आणि गोदाम जास्त वाटत आहे. बस स्टॉप जवळ रस्त्याचे काम सुरू होते. पण नगरसेविका युगंधरा साळेकर यांनी काम थांबवले. त्यामुळे त्याचे सामान स्टॉपवर ठेवण्यात आले आहे. या सामानामुळे प्रवाशांना अडचण होत आहे. शिवाय हा स्टॉप गर्दुल्यांचा अड्डा बनलाय. त्यातच गाड्याही अनधिकृतपणे इथे उभ्या आहेत. याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे असा आरोप स्थानिक करत आहेत. या संदर्भात नगरसेविका युगंधरा साळेकर यांनी बसस्टॉप मोकळा करू असे स्पष्टीकरण दिले.

Loading Comments