Advertisement

राणीच्या बागेला आता ऑनलाईन भेट देता येणार

वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सध्याच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात डिजिटल स्वरूपात येण्यासाठी सज्ज झालं आहे.

राणीच्या बागेला आता ऑनलाईन भेट देता येणार
SHARES

मुंबईतील भायखळा येथील राणीच्या बागेत मुंबईसह राज्यभरातील पर्यटक येत असतात. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सर्व पर्यटन स्थळ बंद केली आहेत. तसंच, राणीची बाग ही बंद करण्यात आली आहे. त्यामुळं लहानग्यांना प्राणीसंग्रालयाला भेच देता येत नाही. त्यामुळं आता वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सध्याच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात डिजिटल स्वरूपात येण्यासाठी सज्ज झालं आहे.

नुकताच सोशल मीडियावर या प्राणीसंग्रहालयातील २ रॉयल बंगाल वाघ शक्ती आणि करिश्मा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी उद्यानाच्या डिजिटल कल्पनेवर विचार करीत होते, अखेर हे उद्यान डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

भायखळा प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणीसंग्रहालय डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्याचा विचार केला जात आहे. लॉकडाऊनमुळं सर्व शैक्षणिक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम बंद पडले आहेत. आता या सर्व गोष्टी ऑनलाईन घेण्याचे विचार केला जात आहे. त्यामुळं लोकांना या गोष्टींचा पुन्हा अनुभव घेता येणार आहे. यूट्यूबसह राणी बागेच्या अधिकृत ट्विटर हँडल सुरु करण्याची योजना आखली जात आहे.

यामुळं लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं संपर्क साधणं सुलभ होणार आहे. प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासकीय समितीकडं हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राणीच्या बागेत औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाकडून फेब्रुवारी महिन्यात विनिमय कार्यक्रमांतर्गत वाघांची जोडी खरेदी करण्यात आली आहे.हेही वाचा -

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजारांच्या पुढेRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा