दहिसर गणपत पाटीलनगरमध्ये लागणार सौरदिवे

 Dahisar
दहिसर गणपत पाटीलनगरमध्ये लागणार सौरदिवे
दहिसर गणपत पाटीलनगरमध्ये लागणार सौरदिवे
दहिसर गणपत पाटीलनगरमध्ये लागणार सौरदिवे
दहिसर गणपत पाटीलनगरमध्ये लागणार सौरदिवे
See all

दहिसर - मुंबई उपनगरांतील मिनी धारावी म्हणून ओळखलं जाणारं दहिसर (प.) येथील गणपत पाटीलनगर आता सौरदिव्यांनी झगमगणार आहे. आमदार मनिषा चौधरी यांच्या निधीतून येथे 40 सौरदिवे लवकरच बसवले जातील. या कामाची सुरुवात नुकतीच माजी महापौर हरेश्‍वर पाटील यांच्या हस्ते झाली.

अनेक वर्षांपासून गणपत पाटीलनगर अंधारात होतं. त्यामुळे येथील रहिवाशांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता. गुन्हेगारांचंही फावलं होतं. रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी पाहता आमदार मनिषा चौधरी यांनी सौरदिवे बसवण्यासाठी पुढाकार घेतला. या वेळी योगिता पाटील, लीलाबेन सोनी आणि भाजपा कार्यकर्तेही उपस्थित होते.

Loading Comments