Advertisement

पुढच्या महिनाभरात ‘आरे’ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- गृहराज्यमंत्री सतेज पाटील

आरे आंदोलनात (aarey protest) सहभागी झालेल्या ज्या आंदोलनकर्त्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हे पुढील ३० दिवसांत मागे घेण्यात येतील, असं आश्वासन राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील (home state minister satej patil) यांनी दिलं.

पुढच्या महिनाभरात ‘आरे’ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- गृहराज्यमंत्री सतेज पाटील
SHARES

आरे आंदोलनात (aarey protest) सहभागी झालेल्या ज्या आंदोलनकर्त्यांवर मुंबई पोलिसांनी (mumbai police) गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हे पुढील ३० दिवसांत मागे घेण्यात येतील, असं आश्वासन राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील (home state minister satej patil) यांनी दिलं.  

आरे आंदोलनात (aarey protest) सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी गुरूवारी गृहराज्य मंत्री सजेत पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गृहराज्यमंत्र्यांना गुन्हे मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यावर पुढील महिनाभरात सरकारी कारवाई पूर्ण करून आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सतेज पाटील (home state minister satej patil) यांनी दिलं. 

हेही वाचा- भीमा-कोरेगाव, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे 

प्रसारमाध्यमांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi) सत्तेत येताच आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकार आजही आपल्या आश्वासनावर ठाम आहे. सामाजिक किंवा राजकीय गुन्हे मागे घेण्याची एक प्रक्रिया असते, त्यासाठी काही नियम आहेत, समितीच्या माध्यमातून गुन्हे मागे घेतले जातात. त्यासंदर्भात मी झोन १२ च्या डीसीपी यांच्यासोबत चर्चा केली असून ते लवकरच समितीसोबत बैठक घेतील. 


मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मिळताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (MMRC)  कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ (metro 3) मार्गाच्या कारशेडसाठी आॅक्टोबर २०१९ मध्ये आरेतील (metro car shed) २ हजार झाडे रातोरात तोडली होती. ही बातमी कळाल्यावर महाविद्यालयीन तरुण, पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिकांनी आरे परिसरात तीव्र आंदोलन केलं होते. हे आंदोलन काही दिवस सुरू होते, पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या कृतीला शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनीही विरोध केला होता. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा- वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांची नोटीस

त्यानुसार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आरे जंगलातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधात नोंदलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. तसंच काही दिवसांनी एमएमआरसीएच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्वीनी भिडे यांची बदली करत त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती केली होती. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा