Advertisement

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांची नोटीस

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (aimim) चे माजी प्रवक्ते आणि माजी आमदार ​वारिस पठाण (aimim waris pathan)​​​ यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी (kalburgi police) त्यांना नोटीस पाठवली आहे.

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारिस पठाण यांना कलबुर्गी पोलिसांची नोटीस
SHARES

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (aimim) चे माजी प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण (aimim waris pathan) यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कर्नाटकातील कलबुर्गी पोलिसांनी (kalburgi police) त्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीनुसार त्यांनी २९ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. 

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आम्ही एमआयएमचे नेते वारिस पठाण यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना २९ फेब्रुवारी रोजी चौकशी समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे, अशी माहिती कलबुर्गीचे पोलीस आयुक्त एम. एन. नागराज यांनी दिली. 

हेही वाचा- वारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई

वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण (speech) केलं होतं. पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. 

आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

महत्त्वाची बाब म्हणजे या व्यासपीठावरून वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याच व्यासपीठावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. पठाण यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशातील सर्वच प्रमुख पक्षांतील नेत्यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली. भाजप (bjp), मनसेनेही (mns) पठाण यांना खडेबोल सुनावले. तर जावेद अख्तर (javid akthar) यांनीही त्यांचे कान उपटले.

एआएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी पठाण यांच्यावर कारवाई करत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घातली. त्यामुळे वारिस पठाण पक्षाच्या वतीने कोणतंही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

हेही वाचा- वारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

आपल्या वक्तव्यावर खुलासा करताना, मी देशविरोधी कुठलंही वक्तव्य केलेलं नाही. प्रसारमाध्यमांनी माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने चालवलं. तरीही माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझं वक्तव्य मागे घेतो, अशा शब्दांत वारिस पठाण यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा