Advertisement

वारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे नेते ​वारिस पठाण​​​ (aimim waris pathan) यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

वारिस पठाण यांचा माफी मागण्यास नकार, पुणे पोलिसांत तक्रार दाखल
SHARES

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे नेते वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही बोललोय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोलल्याचा खुलासा पठाण यांनी केला आहे. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

हेही वाचा- Video: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा

प्रसार माध्यमांशी बोलतना वारिस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत तेच कायद्याच्या विरोधात आहेत. भाजप आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’  

वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण (speech) केलं होतं. वारिस पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. 

आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा- १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला? जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कुणाच्या जीवावर तुम्ही असं वक्तव्य करताहेत? बांगलादेशी आणि पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? अशा शब्दांत पठाण यांना झापलं आहे. तर तुम्ही कोणाचे नोकर आहात? १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला, असा प्रश्न अख्तर यांनी पठाण यांना विचारला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा