Advertisement

Video: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ​बाळा नांदगावकर​​​ (mns leader bala nandgaonkar) यांनी एमआयएमचे नेते वारिस पठाण (Aimim waris pathan) यांना इशारा दिला आहे.

Video: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा
SHARES

कुणाच्या जीवावर तुम्ही असं वक्तव्य करताहेत? बांगलादेशी आणि पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? कडक शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (mns leader bala nandgaonkar) यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) चे नेते वारिस पठाण (Aimim waris pathan) यांना इशारा दिला आहे. आम्ही १५ कोटी मुस्लिम, १०० कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केलं होतं.

हेही वाचा- १५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला? जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले

त्याला मनसे नेते बाळा नांदगावकर (mns leader bala nandgaonkar) यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून नांदगावकर यांनी पठाण यांना समज दिली. ते म्हणाले, वारिस पठाण (aimim waris pathan) चुकीने आमदार झाले होते. १५ कोटी १०० कोटींवर भारी पडणार हे वक्तव्य त्यांनी कुठलाही विचार न करता केलेलं दिसतंय. हिंदुस्तानातील मुस्लिम या मातीवर प्रेम करणारे आहेत. ते आमचे आहेत. पण तुम्ही ज्या मुस्लिमांची गोष्ट करताय ते बांगलादेशी आणि पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? कुणाच्या जीवावर तुम्ही असं वक्तव्य करताहेत? यापुढं असं बेजबाबदार वक्तव्य कराल, तर भायखळाच काय तर तुम्ही कुठंही दिसणार नाहीत. हैदराबादमध्ये जाऊन ओवेसी सोबत जाऊन राहावं लागेल, हा माझा तुम्हाला इशारा आहे.

भायखळ्यातील एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण (speech) केलं होतं. पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा.

हेही वाचा- वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाला मनसेनंही ‘असं’ दिलं उत्तर

आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा