Advertisement

वारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई

एआएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी पठाण यांच्यावर कारवाई करत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे वारिस पठाण पक्षाच्या वतीने कोणतंही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत.

वारिस पठाण यांची बोलती बंदी, पक्षप्रमुखांनी केली कारवाई
SHARES

आम्ही १५ कोटी मुस्लिम, १०० कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य करणारे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे नेते वारिस पठाण (Aimim waris pathan) यांची अखेर बोलती बंद करण्यात आली आहे. एआएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी पठाण यांच्यावर कारवाई करत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे वारिस पठाण पक्षाच्या वतीने कोणतंही सार्वजनिक वक्तव्य करू शकणार नाहीत. 

हेही वाचा-Video: बांगलादेशी, पाकिस्तानी तुमचे बाप आहेत का? बाळा नांदगावकरांचा वारिस पठाण यांना इशारा

वारिस पठाण (aimim waris pathan) यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातील (karnataka) गुलबर्गामध्ये एक भाषण (speech) केलं होतं. पठाण आपल्या भाषणात म्हणाले, जशास तसं प्रतिउत्तर द्यायचं आम्हीही शिकलो आहोत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागेल. स्वातंत्र्य मिळवावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नसेल, ती गोष्ट आता हिसकावून घ्यावी लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. 

आम्हाला बोलतात की आया-बहिणींना पुढं पाठवलं आणि स्वत: ब्लॅंकेटमध्ये बसलेत. पण त्यांना सांगू इच्छितो की आता तर फक्त सिंहिंणीच बाहेर पडल्या आहेत तरी तुम्हाला घाम फुटला आहे. जर आम्ही देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो, तर तुमचं काय होईल, याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं. या सभेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

महत्त्वाची बाब म्हणजे या व्यासपीठावरून वारिस पठाण यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्याच व्यासपीठावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. पठाण यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशातील सर्वच प्रमुख पक्षांतील नेत्यांनी वारिस पठाण यांच्यावर टीका केली. भाजप (bjp), मनसेनेही (mns) पठाण यांना खडेबोल सुनावले. तर जावेद अख्तर (javid akthar) यांनीही त्यांचे कान उपटले. 

त्यानंतरही ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत तेच कायद्याच्या विरोधात आहेत. भाजप आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’  असं म्हणत माफी मागण्यास नकार देणारे पठाण यांच्यावर त्यांच्या पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनीच कारवाई केली आहे. तसंच पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध देखील केला.

हेही वाचा-१५ कोटी मुस्लिमांचा ठेका तुम्हाला कुणी दिला? जावेद अख्तर वारिस पठाणवर भडकले

दरम्यान पठाण यांच्यावर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा