Advertisement

'डेल्टा प्लस' हा चिंताजनक; राज्याला सतर्कतेचा इशारा

‘डेल्टा प्लस’ हा चिंताजनक विषाणू असून, त्याचे रुग्ण आढळलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

'डेल्टा प्लस' हा चिंताजनक; राज्याला सतर्कतेचा इशारा
SHARES

कोरोनानंतर (coronavirus) मुंबईसह राज्यभरातील जनतेला आता ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका आहे. ‘डेल्टा प्लस’ हा चिंताजनक विषाणू असून, त्याचे रुग्ण आढळलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र (maharashtra), केरळ, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

केंद्राच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरात ‘डेल्टा प्लस’चे २२ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रातील १६ रुग्णांचा समावेश असल्याचे केंद्राचे म्हणणे असले तरी महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात या नव्या विषाणूचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्या अधिक असण्याची शक्यता आहे. ‘डेल्टा प्लस’च्या फैलावाचा वेग अधिक असल्याचे मानले जाते.

महाराष्ट्रात (maharashtra) आढळलेल्या ‘डेल्टा प्लस’च्या २१ रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असल्याचे आढळले आहेत. या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे आणि बाधित रुग्णांचे नमुने तपासण्यांसह सर्वेक्षण आरोग्य विभागाने सुरू केले आहे.

‘डेल्टा प्लस’ हे कोरोनाचे (covid 19) ‘निरीक्षणाधीन उत्पर्विन’ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले होते. मात्र, ‘इन्साकॉग’ने ‘डेल्टा प्लस’ हे ‘चिंताजनक उत्परिवर्तन’ असल्याची माहिती दिल्याचे आरोग्य मंत्रालयानं नंतर जाहीर केलं.

‘डेल्टा प्लस’चे रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७, मुंबईत दोन आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीत सुरुवातीला ६ रुग्णांमध्ये ‘डेल्टा प्लस’ आढळले होते. त्यानंतर ५० जणांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले होते. त्यातून आणखी ३ जणांमध्ये हा विषाणू आढळला असून रत्नागिरीत या विषाणूचे सध्या ९ रुग्ण झाले आहेत.

भारतासह १० देशांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले आहेत. त्यात अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्र्झलड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. तर प्रथम भारतातच आढळलेल्या ‘डेल्टा’ विषाणूचे रुग्ण आतापर्यंत ८० देशांत आढळले आहेत.



हेही वाचा -

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा