Advertisement

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

मोरबे धरण (morbe dam) ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचं काम बुधवारी २३ जून रोजी तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

नवी मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

मोरबे धरण (morbe dam) ते दिघा मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचं काम बुधवारी २३ जून रोजी तातडीने हाती घेण्यात येणार आहे.  त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र (Bhokarpada Water Treatment Plant) येथील पाणी पुरवठा (water supply) बंद राहणार आहे. परिणामी नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai municipal corporation) क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात बुधवारी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही.

या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसंच गुरुवार दिनांक २४ जून रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे. 



हेही वाचा -

लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ

मुंबईत २७ जूनपर्यंत निर्बंध; काय सुरू, काय बंद?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा