कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळं जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडता छोट्या-मोठ्या हॉटेलसह सर्वच बंद आहे. त्यामुळं गरजूंच्या २ वेळेच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. यातूनही मध्य रेल्वेनं दिलासा दिला असून, गरजूंना खाद्यपदार्थाच्या पाकिटांचं वाटप केलं आहे.
गेल्या २ दिवसांत ३ हजार ५०० खाद्यपदार्थाची पाकिटं वाटण्यात आल्याची माहिती मिळते. तसंच, पश्चिम रेल्वेनंही आतापर्यंत २ हजारपेक्षा जास्त पाकिटं वाटली आहेत. मध्य रेल्वेनं मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ आणि पुणे विभागातील विविध स्थानकांवर २८ मार्चला १ हजार, तर २९ मार्चला अडीच हजार खाद्यपदार्थाची पाकिटं गरजू लोकांना वाटली.
मध्य रेल्वेचा वाणिज्य विभाग, आयआरसीटीसी, स्वयंसेवी संस्था, आरपीएफ कर्मचारी इत्यादींनी गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. मुंबई विभागात इगतपुरी इथं ३००, कफ परेडमध्ये १५०, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मस्जिद येथे २००, कल्याणमध्ये १२५, कर्जत ४०० यासह अन्य भागात त्यांचं वाटप केलं. पश्चिम रेल्वेनंही मुंबईतील सीएसएमटी परिसर, मस्जिद यासह अन्य भागांत खिचडीचं वाटप केलं आहे.
हेही वाचा -
आता ‘झोमॅटो’द्वारे घरपोच मिळणार किराणा सामान
जुहूत पोलिसांच्या अमानुष मारहाणीतच तरुणाचा मृत्यू ?, भावाचा आरोप