Advertisement

लॉकडाऊनमुळं मुंबई - गोवा ट्रेन बंद

मुंबई ते गोवा ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.

लॉकडाऊनमुळं मुंबई - गोवा ट्रेन बंद
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई ते गोवा ट्रेन रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यानुसार, सीएसएमटी ते करमाळी तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी ते मँगोलोर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळं राज्य सरकारनं लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी म्हणजे १५ तारखेपर्यंत वाढवला आहे. शिवाय, कर्नाटक सरकारनं ही लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळं या मार्गावरील ट्रेन रद्द करण्यात आली आहे. 

याआधी मध्य रेल्वे प्रशासनानं अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. तसंच लोकल प्रवास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा