Advertisement

होळीदरम्यान फुकट्या प्रवाशांकडून ५९ लाखांचा दंड


होळीदरम्यान फुकट्या प्रवाशांकडून ५९ लाखांचा दंड
SHARES

मध्य रेल्वेने होळी आणि रंगपंचमीनिमित्त राबवलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ५९ लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या 'स्पेशल फ्लाईंग स्क्वॉड' (भरारी पथका)ने ही कामगिरी केली आहे. २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये रेकार्ड ब्रेक दंड वसूल करण्यात आला आहे.

२५ फेब्रुवारीला १ हजार ५३८ विना तिकिटांच्या प्रकरणात १० लाख ५८ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

तर, २६ तारखेला १ हजार ४१० गुन्ह्यांमध्ये ९ लाख ६१ हजार ३० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

२८ फेब्रुवारीला १ हजार १४९ फुकट्यांकडून ७ लाख ३१ हजार ९५५ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे, प्रवाशांनी आपली मानहानी आणि रेल्वेचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य ते तिकीट खरेदी करुनच प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा