सीएसएमटी परिसरातील वीजपूरवठा अर्धा तास खंडीत

वीजपुरवठा करणाऱ्या रेल्वेच्या सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये अँदार पसरला होता.

SHARE

वीजपुरवठा करणाऱ्या रेल्वेच्या सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये अँदार पसरला होता. रविवारी संध्यकाळच्या सुमारास वीजपूरवठा खंडीत झाला होता. सीएसएमटीत काळोख पसरताच मध्य रेल्वेने काही मिनिटांत आपत्कालीन वीजपुरवठा कार्यान्वित करून स्थानकातील ४० टक्के वीजपुरवठा सुरू केला. परंतु, उर्वरित भागात अंधार कायम होता.

गोंधळाची स्थिती

अचानक वीज गेल्यामुळे सीएसएमटीतील प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सीएसएमटीतील दिवे, लोकलचे इंडिकेटर, मेल-एक्स्प्रेसचे इंडिकेटर, नियंत्रण कक्ष अशा सर्वच ठिकाणांची वीज गेल्यानं स्थानकात पूर्ण अंधार पसरला होता. स्थानकाबाहेरील सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

४० टक्के वीजपुरवठा

त्यानंतर, काही मिनिटांत मध्य रेल्वेने स्थानकातील काही दिवे, लोकल आणि मेल-एक्स्प्रेसचे इंडिकेटर, नियंत्रण कक्ष, मोटरमन-गार्ड लॉबीतील वीज उपकरणे असा ४० टक्के वीजपुरवठा सुरू केलाहेही वाचा -

'हिंदू दहशतवाद' या उल्लेखाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी- संबित पात्रा

मागील ५ वर्ष वेळ नव्हता का? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवालसंबंधित विषय
ताज्या बातम्या