Advertisement

मागील ५ वर्ष वेळ नव्हता का? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल


मागील ५ वर्ष वेळ नव्हता का? राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात प्रचारसभा घेत आहे. या सभांमध्ये राज ठाकरे यांनी विरोधा पक्षाची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मत द्या, असं आवाहन केलं. त्याशिवाय रविवारी दहिसर इथं झालेल्या सभेत राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसंच, 'पीएमसी बँकेवर भाजपचे तर सिटी कोऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचे नेते आहेत'. असा आरोप करत 'ही मंडळी भ्रष्टाचार दूर करण्याच्या गप्पा हाणत आहे', अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

धमक्या देण्याचं काम

'पैशांचं काम अडलं की केवळ आर्थिक हितसंबंधांसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांनी धमक्या देण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप करत गेली ५ वर्षे त्यांना आपल्या खिशातील राजीनामे बाहेर काढता आले नाहीत अशी टीका राज ठाकरे यांनी केली. 'हीच ती वेळ असं शिवसेना भाजपच्या होर्डिंगच्या खाली लिहिलं असून, मग गेली ५ वर्षे वेळ नव्हता का?' असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

लोकांनी आक्रोश केला

'गोरेगावच्या आरे कॉलनीतील २ हजारांहून अधिक झाडं रातोरात तोडण्यात आली. लोकांनी आक्रोश केला मात्र, उद्धव ठाकरे झाडं तोडल्यावर म्हणतात की सत्तेत आल्यानंतर आरे जंगल म्हणून घोषित करू. आता तिकडं काय गवत लावणार? शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एक ओळही नाही,' असंही राज ठाकरे यांनी सभेत म्हटलं.

निर्णय चुकला

'देश चालवता येत नाही, म्हणून मोदी सरकारनं रिझर्व्ह बँकेकडून १ लाख ७० हजार कोटी घेतले. हे तुमचे पैसे आहेत. मोदी सरकारनं नोटबंदी केली, त्यानंतर १० दिवसांत मी बोललो होतो की निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात जाईल. आज ३ कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. तुमच्या हातात बहुमत असताना उद्योगधंदे बंद का पडत आहेत. पारले जी कंपनीनं १० हजार लोकांना काढून टाकणार असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येकाच्या घरी ४ लोक म्हटलं तरी त्या ४० हजार लोकांनी करायचं काय?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.हेही वाचा -

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची एटीव्हीएम तिकीट विक्रीला पसंती

रोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणारसंबंधित विषय
Advertisement